September 8, 2024
+91 9867577208

जागतिक मराठी भाषा दिवस

  • Date: Thursday, Feb 27, 2020
  • Time: 2:00 PM - 3:00 PM
  • Location: St.John Junior College
Featured Image

जागतिक मराठी भाषा दिवस २७ फेब्रुवारी २०२० रोजी सेंट जॉन ज्युनिअर कॉलेज मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा. श्री. विक्रम जोशी सर आणि शिक्षक वृंद उपस्थित होते. मराठी भाषेशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य शाखेची विद्यार्थी खुशी सोनी हिने केले. विज्ञान शाखेतील विद्यर्थिनी तेजस्वीनी कदम हिने मराठी भाषा दिवस का साजरा केला जातो. कविवर्य कुसुमाग्रजांच्या अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या साहित्यसंपदेविषयी माहिती दिली. आणि हर्षल बदाने याने पोवाडा सादर केला. तसेच वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी वैष्णवी गोसावी हिने सुंदर अभंगाचे गायन केले. त्याचबरोबर वैभव सुरती ह्यांनी मराठी भाषेविषयी गोडी वाढावी याकरिता आकर्षक P. P. T. चे सादरीकरण केले. श्रद्धा जैन हिने गीत गायन केले. दिया जानी, खुशी सोनी , आस्था वरठा ह्यांनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीया गाण्यावर एक नृत्य सादर केले. शेवटी मराठी विषयाच्या शिक्षिका सौ. चिन्मयी चुरी ह्यांनी मराठी भाषेची सद्यस्थिती, मराठी भाषेचे संवर्धन कसे करावे , मायबोलीचे महत्त्व याविषयी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.