July 12, 2024
+91 9867577208

जागतिक मराठी भाषा दिवस

  • Date: Saturday, Feb 27, 2021
  • Location: ST.JOHN JUNIOR COLLEGE
Featured Image

जागतिक मराठी भाषा दिवस २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सेंट जॉन ज्युनिअर कॉलेज मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्या मा. सौ.सुचिता घरत आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.

मराठी भाषेशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला शाखेची विद्यार्थीनी जिज्ञासा म्हात्रे हिने केले. विज्ञान शाखेतील श्रावणी व कला शाखेतील वृंदा ह्या विद्यार्थीनींनी मराठी भाषा दिवस का साजरा केला जातो, तसेच कविवर्य कुसुमाग्रजांच्या अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या साहित्यसंपदेविषयी माहिती दिली. त्याचबरोबर तृषा नलावडे हिने मराठी भाषेविषयी गोडी वाढावी याकरिता आकर्षक P.P.T. चे सादरीकरण केले. ईशिता हिने स्वरचित गीत गायन केले. ऋतुजा, नेहा ,उपासना , अर्पिता समूह गीत ह्यांनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीहे गीत गायन केले. आशुतोष, जिज्ञासा आणि त्यांच्या समूहाने शिवाजीराजांवर आधारित नाटक सादर केलं.शेवटी मराठी विषयाच्या शिक्षिका सौ.चिन्मयी चुरी ह्यांनी मराठी भाषेची सद्यस्थिती, मराठी भाषेचे संवर्धन कसे करावे, मायबोलीचे महत्त्व याविषयी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.